महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:40:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "महाराष्ट्र दिन"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

     महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

     "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" या जयघोषातच दरवर्षी महाराष्ट्रात १ मे या दिवसाची सुरूवात होते. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिन' मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी  तुम्हाला शेअर करण्यासाठी महाराष्ट्र दिवस शुभेच्छा

=========================================
--भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा... जय जय महाराष्ट्र देशा

--बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--शिव निष्ठा येथ असे सतत जागती...अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा 

--पैठणचे प्रेम अमित देश कोकणा... पंढरीस ये विदर्भ देवदर्शना... अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र... माझ्या राजाचा महाराष्ट्र...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... गुणगुणलो जे गीत गीत मराठी.... मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र

--आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन

--महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

--महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की, महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ.

--महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे. महाराष्ट्र दिन 2021 च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================