महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:41:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "महाराष्ट्र दिन"
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

     महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

     महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा इतिहास मराठी माणून कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच हे संदेश मनात महाराष्ट्रीन असल्याचा अभिमान निर्माण करतात. खालील Maharashtra din quotes in marathi या दिवसाच्या निमित्ताने नक्की शेअर करा.  महाराष्ट्र दिनाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा

     महाराष्ट्र दिन विशेष साजरा करण्याठी आपण आपल्या प्रियजनांना Maharashtra Day Wishes In Marathi पाठवतो. यासाठी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.

=========================================
--जय जय महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

--प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा

--मंगल देशा... पवित्र देशा... महाराष्ट्र देशा...प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--गर्जा महाराष्ट्र माझा.... जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा

--राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

--कपाळी केशरी टिळा लावितो... महाराष्ट्र देशा तुला वंदितो.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... जय जय महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा... महाराष्ट्र  दिनाच्या शुभेच्छा 

--महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा

--इतरांना पडला असेल विसर पण या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा त्यांचं ही होऊ दे स्मरण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

--दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================