महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:46:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "महाराष्ट्र दिन"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

     महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

     महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वजण आपल्या परिचयातील लोकांना Maharashtra Day Wishes In Marathi पाठवतात. त्यासाठी हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा नक्कीच उपयुक्त आहेत.

=========================================
--महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--आम्हाला  अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा, आम्हाला  गर्व आहे मराठी भाषेचा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--मराठा तितुका  मेळवावा... महाराष्ट्र अखंड राखावा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--मराठी माणसाने मनात मनात जपला आहे महाराष्ट्र माझा... जय महाराष्ट्र

--महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा

--माझे राज्य... मराठी माणसाचे राज्य....जय महाराष्ट्र

--महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद... महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त, त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त

--माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्राचा, मला आहे अभिमान मी मराठी असण्याचा
जन्मोजन्मी होईन महाराष्ट्रीन, हे मातृभूमी तुझा मी सदैव मान राखीन, महाराष्ट्र दिवस शुभेच्छा

--मर्द मराठ्यांचा हा मुलुख
शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या
महाराष्ट्राचा अभिमान आहे मला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--मी मराठी माझं राज्य मराठी
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश
एकत्र आलो तर मजबूत
वेगळे राहिलो तर कमजोर
एकत्र राहू आणि उंच जाऊ
जय महाराष्ट्र

--अभिमानाने भरलेली छाती, सळसळणारं रक्त
रोमारोमात आहे भगव्या झेंड्याचा स्वाभिमान
जय शिवाजी जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

--महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या
प्रत्येकाला मानाचा मुजरा
अखंड महाराष्ट्राच्या सर्व जनांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================