महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:48:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "महाराष्ट्र दिन"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

     महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

     सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे तेव्हा सोशल मीडियावर स्टेटस अपडेटसाठी हे Maharashtra din quotes in marathi नक्कीच खास आहेत.

=========================================
--महाराष्ट्र चिरायू होवो... महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा माझा आहे महाराष्ट्र माझा

--दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो कर महाराष्ट्राची होईन...तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--महाराष्ट्र ही एक चाल आहे जी सर्वांनी मिळून गुणगुणावी.... जय महाराष्ट्र...

--जय महाराष्ट्र जय मराठी.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान... या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण
महाराष्ट्राची गावी स्तुती दररोज पोटभरून...महाराष्ट्राने ठेवलं आहे आपल्या सर्वांना धरून
कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची.... माझ्या महाराष्ट्राची... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र

--माझ्या राष्ट्राच्या मातीला सुंगध आहे मराठी माणसांचा, नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा

--नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे
ज्यांनी रचली शौर्याची गाथा
जाणता होता आमचा राजा
अशा महाराष्ट्र देशा

--तुझ्या भूमीला माझं वंदन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--इतिहास लिहीणं सोपं आहे
पण आमच्या राजांनी इतिहास घडवला
महाराष्ट्र घडवला आम्हाला घडवलं
पवित्र देशा महाराष्ट्र देशा

--माझे कर्म महाराष्ट्र
माझा धर्म महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

--ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव
उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--कपाळी लावूनी केशरी टिळा
नमन करितो तुला महाराष्ट्र देशा
जय महाराष्ट्र
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================