महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:51:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "महाराष्ट्र दिन"
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

=========================================
--महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान आहे मराठी असल्याचा

--दगड झालो तर "सह्याद्रीचा" होईन!
माती झालो तर "महाराष्ट्राची" होईन!
तलवार झालो तर "भवानी मातेची" होईन!

--महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

--दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
कामगार दिन व महाराष्ट्रदिन
निमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!

--भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

--जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन व कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!

--बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳
=========================================

                    (साभार एवं सौजन्य-संदर्भ-दीप शायरी कोट्स.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================