महाराष्ट्र दिन-शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, May 01, 2023, 04:54:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "महाराष्ट्र दिन"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक ०१.०५.२०२३-सोमवार आहे. आज "महाराष्ट्र दिन" आहे. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो  मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना महाराष्ट्र दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही शुभेच्छा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

=========================================
--अनंत संकटे सहन करूनही
कणखर असे माझे राष्ट्र
टाकावा ओवाळून
जीव असा माझा महाराष्ट्र .
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳

--एकजुटीने काम करू कामावरती
प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏 जय महाराष्ट्र 🙏

--अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा !!!
जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

--माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा...
गर्जा महाराष्ट्र माझा...!

--दगड झालो तर 'सह्याद्रीचा' होईन! माती झालो तर 'महाराष्ट्राची' होईन!
तलवार झालो तर 'भवानी मातेची' होईन!
आणि... पुन्हा मानव जन्म मिळाला तर 'मराठीच' होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!

--माझ्या सर्व मराठी बंधू आणि
भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र!
⛳ जय महाराष्ट्र ⛳
=========================================

                   (साभार एवं सौजन्य-संदर्भ-दीप शायरी कोट्स.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.05.2023-सोमवार. 
=========================================