दिन-विशेष-लेख-जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

Started by Atul Kaviraje, May 03, 2023, 10:37:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                               "जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन"
                              ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-03.05.2023-बुधवार आहे, 03 मे हा दिवस "जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस' दरवर्षी 3 मे रोजी जगभरात साजरा केला जातो.

     आजचा दिवस प्रेस स्वातंत्र्य दिन किंवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन ('प्रेस फ्रिडम डे') म्हणून साजरा केला जातो.

     १९९१ मध्ये आफ्रिकेतील पत्रकारांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेऊन एका विशेष मोहिमेला सुरुवात केली. ३ मे १९९१ रोजी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकारांची परिषद भरली होती. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढील वर्षांपासून (१९९२ सालापासून) ३ मे हा दिवस 'प्रेस फ्रिडम डे' (पत्रकारिता स्वातंत्र्य दिन) म्हणून साजरा केला जाऊ लागला.

     १९९३ मध्ये 'युनेस्को'ने 'जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन' साजरा करण्यास मंजुरी दिली. 'युनेस्को'तर्फे १९९७ सालापासून दरवर्षी ३ मे रोजी 'जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिना' निमित्त 'गिलेरमो कानो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज अॅावॉर्ड' दिले जाते. पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या पत्रकाराला हा पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी फिलीपिन्सचे पत्रकार आणि मीडिया कार्यकारी 'मारिया रेसा' यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यानिमित्ताने माध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारांची सुरक्षितता आदी विषयांवर जगभर चर्चा होते.

     दर वर्षी एखादी थीम ठरवून, त्यासंबंधीही विचार विनिमय  केले जाते. या वर्षाची थीम आहे: 'Information as a Public Good'. दर वर्षी या दिवशी वेगळ्या देशात वृत्तपत्र स्वातंत्र्य विषयक थीमवर परिषद भरवली जाते.

     पत्रकारांसाठी विशेष समजल्या जाणा-या या दिवसाच्या आपल्या समस्त पत्रकार बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.

--संजीव वसंत वेलणकर
---------------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-बाईट्स ऑफ इंडिया.कॉम)
                -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.05.2023-बुधवार.
=========================================