बुद्ध पौर्णिमा-गौतम बुद्ध-कविता-4

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:21:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "बुद्ध पौर्णिमा"
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्धावर काही कविता.

                                      "गौतम बुद्ध"
                                     ------------

शुद्धोधन महामायाच्या उदरी

सिद्धार्थ जन्मले लुंबिनी नगरी


जन्मल्या अवघ्या काही दिवसांत

त्यांना सोडून आई गेली परलोकात


पुढे गौतमी मावशीने सांभाळले

म्हणून गौतम नाव त्यांचे पडले


पत्नी यशोधरा बनली अर्धांगिनी

राहुल सारखा पुत्र लाभला जीवनी


सुख समृद्धी लोळत होती पायात

काहीच कमी नव्हते या जीवनात


त्यांचे मन संसारात नाही रमले

ज्ञानप्राप्तीसाठी वणवण फिरले


बोधगया हे ठिकाण झाले पावन

पिंपळ वृक्षाखाली मिळविले ज्ञान


सारनाथ येथून सुरू केले उपदेश

संदेश सांगण्यासाठी फिरले प्रदेश


सांगून अष्टांग मार्ग ते देह ठेवले

कुशीनगर येथे शेवटी ते थांबले

--नासा येवतीकर
---------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================