बुद्ध पौर्णिमा-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, May 05, 2023, 10:37:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बुद्ध पौर्णिमा"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०५.२०२३-शुक्रवार आहे. आज "बुद्ध पौर्णिमा" आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना बुद्ध पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.

=========================================
--वाईटापासून दूर राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे मनात चांगले विचार करणे...बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

--तुमच्याकडे जे आहे ते वाढवून चढवून सांगू नका, इतरांचा द्वेष करू नका,
कारण इतरांचा द्वेष मत्सर करणाऱ्या व्यक्तीला कधीच शांती मिळत नाही...
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

--विश्वाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे 'भगवान गौतम बुद्ध' यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

--बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

--बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

--तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्मित क्रिएशन.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.05.2023-शुक्रवार.
=========================================