०६-मे-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 06, 2023, 11:13:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०५.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "०६-मे-दिनविशेष"
                                  ------------------

-: दिनविशेष :-
०६ मे
International No Diet Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००२
भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००१
पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९९९
महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना तीस टक्‍के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
१९९७
'बँक ऑफ इंग्लंड'ला स्वायत्तता देण्यात आली. १९४६ मध्ये क्लेमंट अ‍ॅटली सरकारने या बँकेचे राष्ट्रीयीकरण केले होते.
१९९४
युरो टनेल
इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते इंग्लिश खाडीखालुन जाणार्‍या आणि इंग्लंड व फ्रान्स यांना जोडणार्‍या'युरो टनेल'चे उद्‍घाटन झाले.
१८४०
पेनी ब्लॅक
एक पेनी किमतीचे 'पेनी ब्लॅक' नावाचे जगातील पहिले (चिकटवण्याचे) टपाल तिकीट इंग्लंडमध्ये विक्रीसाठी खुले झाले. हे तिकीट १ मे १८४० रोजी जारी झाले होते.
१८१८
राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली. [वैशाख शु. १ शके १७४०]
१६३२
शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
१५४२
सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५३
टोनी ब्लेअर
टोनी ब्लेअर – ब्रिटनचे पंतप्रधान (२ मे १९९७ ते २७ जून २००७) आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष
१९५१
लीला सॅमसन
लीला सॅमसन – भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका आणि लेखिका. पद्मश्री (१९९०), संगीत नाटक अकादमी पारितोषिक (२०००), नृत्य चुडामणी (२००५) इ. अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित कलाकार. संगीत नाटक अकादमी आणि फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा
१९२०
बुलो सी. रानी
बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक
(मृत्यू: २४ मे १९९३ - मुंबई)
१८६१
मोतीलाल नेहरू
मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)
१८५६
सिग्मंड फ्रॉईड
Sigmund Freud by Max Halberstadt, 1921
सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व मनोविश्लेषक, आधुनिक मानसशास्त्राचा जनक
(मृत्यू: २३ सप्टेंबर १९३९)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०२१
चौधरी अजित सिंग
चौधरी अजित सिंग – केंद्रीय मंत्री, १५ व्या लोकसभेतील खासदार (मथुरा), राष्ट्रीय लोकदल या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष, पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे चिरंजीव
(जन्म: १२ फेब्रुवारी १९३९)
२०२१
प्रतीक चौधरी
प्रतीक चौधरी – सानिया घराण्याचे सतारिये, दिल्ली विद्यापीठातील संगीताचे प्राध्यापक (कोविड-१९)
(जन्म: ७ सप्टेंबर १९७१)
२०१७
उस्ताद रईस खान – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
(जन्म: २५ नोव्हेंबर १९३९)
१९९९
कृष्णाजी शंकर हिंगवे – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य
(जन्म:? ? ????)
१९९५
आचार्य गोविंदराव गोसावी – प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ? ? ????)
१९६६
र. पु. परांजपे
रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री (१९२१–२३), अबकारी खात्याचे मंत्री (१९२७), इंडियन कौन्सिलचे सभासद (१९२७–३२), लखनौ व पुणे विद्यापीठांचे कुलगुरू (अनुक्रमे १९३२–३८ व १९५६–५९) व ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्‍चायुक्त (१९४४–४७) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. पुणे नगरपालिकेचे ते काही काळ सदस्य होते. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले. ब्रिटिश सरकारने कैसर-इ-हिंद सुवर्णपदक (१९१६) व नाइटहूड (१९४२) देऊन त्यांचा गौरव केला.
(जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)
१९५२
मारिया माँटेसरी
मारिया टेकला आर्टेमिसिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा 'माँटेसरी' या नावाने ओळखल्या जातात.
(जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)
१९४६
भुलाभाई देसाई
भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे 'गांधी-आयर्विन' कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती.
(जन्म: १३ आक्टोबर १८७७)
१९२२
छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक
(जन्म: २६ जून १८७४)
१८६२
हेन्‍री डेव्हिड थोरो
हेन्‍री डेव्हिड थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत, निसर्गवादी
(जन्म: १२ जुलै १८१७)
१५८९
तान सेन
रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तान सेन – अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न
(जन्म: ? ? १५०६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.05.2023-शनिवार.
=========================================