दिन-विशेष-लेख-नो डाएट डे

Started by Atul Kaviraje, May 06, 2023, 11:16:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                      "नो डाएट डे"
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-06.05.2023-शनिवार आहे, 06 मे हा दिवस "नो डाएट डे" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     6 मे रोजी International No Diet Day साजरा केला जातो. यामागचं कारण काय आहे जाणून घ्या. ब्रिटीश महिला मेरी इव्हान्स यांनी 6 मे 1992 रोजी ब्रिटनमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे साजरा केला. लोकांना स्वतःला जसेच्या तसे स्वीकारले पाहिजे असा मेरी यांचा उद्देश होता.

     International No Diet Day : एक दिवस डाएटला सुट्टी, आज 'नो डाएट डे', काय आहे यामागचं कारण ?

     International No Diet Day : जगभरात आज म्हणजेच 6 मे रोजी 'आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे' साजरा केला जातो.

     आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण आपल्या डाएटकडे विशेष लक्ष देताना पाहायला मिळतो. काही जण वजन कमी करण्यासाठी तर, काही जण वजन वाढवण्यासाठी डाएट करताना दिसतात. यामुळे प्रत्येक आपल्या आहारावर नियंत्रण ठेवतात. आठवडाभर डाएट करणारा प्रत्येक जण येणाऱ्या एका चीट डेची आतुरतेने वाट पाहत असतो. डाएट करणारा व्यक्ती आठवडाभर खाण्यावर नियंत्रण ठेवू डाएट पाळत असतो. अशा व्यक्तींना एक दिवस दिलासा मिळण्यासाठी आणि स्वत:वर प्रेम करण्यासाठी नो-डाएट डे साजरा केला जातो.

     मात्र अशात प्रत्येक जण चीट डेची वाट पाहत असतो. ज्या दिवशी त्यांना आवडीचे पदार्थ खाता येतात. असाच एक चीट डे आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. 6 मे रोजी International No Diet Day साजरा केला जातो. यामागचं कारण काय आहे जाणून घ्या.

                    इतिहास--

     ब्रिटीश महिला मेरी इव्हान्स यांनी 6 मे 1992 रोजी ब्रिटनमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे साजरा केला. लोकांना स्वतःला जसेच्या तसे स्वीकारले पाहिजे असा मेरी यांचा उद्देश होता. डाएटिंगमुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागरुक करावे अशी मेरी यांची इच्छा होती.

                  काय आहे या मागचा मूळ उद्देश ?--

     आजकाल लोक स्वत:ची इतरांसोबत तुलना करतात. काहींना इतरांप्रमाणे बारीक होण्याची तर काहींना जाड होण्याची इच्छा असते. मात्र आपण इतरांसोबत स्वत:ची तुलना करण्याऐवजी स्वत:ला जसे आहे तसे स्विकारायला हवं. स्वत:वर प्रेम करायाला हवं हा आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे साजरा करण्यामागचा मूळ उद्देश आहे.

--By: एबीपी माझा वेब टीम
Edited By: स्नेहल पावनाक
-------------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.abp लाईव्ह.कॉम)
                 ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.05.2023-शनिवार.
=========================================