II श्री गणेशाय नमः II-संकष्टी चतुर्थी-सण गौरी गणपतीचा आला

Started by Atul Kaviraje, May 08, 2023, 11:14:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री गणेशाय नमः II
                                       "संकष्टी चतुर्थी"
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-08.05.2023-सोमवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया श्रीगणेश गीत - "सण गौरी गणपतीचा आला"

  जानते हैं चतुर्थी तिथि का महत्व और तारीख। ज्येष्ठ मास के कृष्ण पक्ष की चतुर्थी तिथि की शुरुआत 8 मई 2023 की शाम 6 बजकर 18 मिनट से होगी और 9 मई शाम में 4 बजकर 7 मिनट तक चतुर्थी तिथि रहेगी। ऐसे में संकष्टी चतुर्थी का व्रत 8 मई को रखा जाएगा।

     मे महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे खास; तुमच्या शहरात केव्हा होईल चंद्रोदय? जाणून घ्या. Sankashti Chaturthi May 2023 : ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे.

     ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. Sankashti Chaturthi May 2023: हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. वर्षामध्ये २४ चतुर्थी येतात. यानुसार, प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. पहिली कृष्ण पक्षामध्ये येते जिला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते तिला विनायक चतुर्थी म्हणतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि व्रत करण्याची पद्धत आहे. या दिवशी गणपतीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळते आणि प्रत्येक प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. चला संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊ या.

              ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी--

     ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. पंचांगानुसार, चतुर्थी ८ मे २०२३ रोजी संध्याकाळी ६.१८ वाजता सुरू होत आहे, जी ९ मे २०२३ रोजी संध्याकाळी ४.०३ वाजता संपेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. त्यामुळे ८ मे रोजीच संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाणार आहे.

                 ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला शुभ योग--

अभिजीत मुहूर्त – सकाळी ११.५१ ते दुपारी १२.४५ पर्यंत
शिवयोग – ९ मे रोजी पहाटे २.५२ ते १२.०९ पर्यंत
ज्येष्ठ नक्षत्र -८ मे रोजी सूर्योदयापासून रात्री ७.१९ पर्यंत

               ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी २०२३ पूजा विधी--

     संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान इ. करून घ्या. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीगणेशाचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा. यानंतर गणेशाची पूजा करावी. सर्वप्रथम देवाला फुलांद्वारे जल अर्पण करावे. यानंतर फुले, हार, दुर्वा, सिंदूर, अक्षता, नैवेद्य इ. अर्पण करावे. यानंतर तुमच्या आवडीनुसार मोदक, बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. यानंतर पाणी अर्पण करावे. नंतर तुपाचा दिवा व उदबत्ती लावून कथेसह मंत्रोच्चार इ. करावे. शेवटी विधिवत आरती करावी. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी अर्घ्य देऊन चंद्राची पूजा करावी. यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.

--लाइफस्टाइल न्यूज डेस्क
--------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                      ----------------------------------------

                              "सण गौरी गणपतीचा आला"
                             --------------------------

गणपती  बाप्पा  मोरया
मंगल  मूर्ती  मोरया
गणपती  बाप्पा  मोरया
मंगल  मूर्ती  मोरया

सण  गौरी  गणपती  चा  आला
साऱ्या  गावानं  जलोष  झाला     
गौरी  नंदन  पार्वतीच्या  बाळा
तुला  पाहुनी  आनंद  झाला

सण  गौरी  गणपती  चा  आला
साऱ्या  गावानं  जलोष  झाला 
ढोल  ताशांचा  तर्राररा  वाजला
माझा  गणपती  नाचत  आला

काय  मागू  मी  तुझ्या  चरणाशी
तुला  सर्व  ठाव  हाय  ना
तूच  दाता  तूच  विधाता
तूच  आमचा  पाठीराखा

हे  माझ गाऱ्हाणं  गातो  तुज्याशी
देवा  पदरात  ठेवा  आम्हांसी
माज्या  देवाला  फुलान  सजवा
माज्या  गणाला  नैवेद्य  दावा
माज्या  गणाला  नैवेद्य  दावा

सण  गौरी  गणपती  चा  आला
साऱ्या  गावानं  जलोष  झाला     
गौरी  नंदन  पार्वतीच्या  बाळा
तुला  पाहुनी  आनंद  झाला

सण  गौरी  गणपती  चा  आला
साऱ्या  गावानं  जलोष  झाला   
ढोल  ताशांचा  तर्राररा  वाजला
माझा  गणपती  नाचत  आला

एक  वर्सानी  गणपती  आले  घर
भक्तांच्या  मनी  हो  आनंद  झाला
उकडीचे  मोदक  पुरणाची  पोळी
बाप्पाला  माझ्या  देऊ  करा  हे

ठोक्यात  वाजतोय  ढोली  बाजा
हर्षाने  नाचतोय  भक्त  सारा
लेक  ही  आली  माहेरी  आपल्या
गौरी  गणपती  चे  सणाला

जमली  पोर  सारी  आज  अंगणात
लाडक्या  बाप्पाला  नमन  करायला
असो  बाले  नृत्य  किंवा  मंगळा   गौर
आज  आनंद  झाला  जीवाला
आज  आनंद  झाला  जीवाला

हे  मंगलमूर्ती  गणराया
तुझ्या  कृपेची  असुदे  छाया
तुझ्या  चरणी  पडितो  मी  पाया
मला  दर्शन  दे  गणराया

गणपती  बाप्पा मोरया

सण  गौरी  गणपती  चा  आला
साऱ्या  गावानं  जलोष  झाला   
गौरी  नंदन  पार्वतीच्या  बाळा
तुला  पाहुनी  आनंद  झाला

सण  गौरी  गणपती  चा  आला
साऱ्या  गावानं  जलोष  झाला   
ढोल  ताशांचा  तर्राररा  वाजला
माझा  गणपती  नाचत  आला

--सोनाली  भोईर - गणेश  गावंड
----------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.05.2023-सोमवार.
=========================================