!! माय माऊली !!

Started by Ashok_rokade24, May 14, 2023, 07:19:12 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

!! माय माऊली !!
***************
गोठ्यात वासरू एकले ,
माऊली कुठेच दिसेना ,
उदरी भुकेचा वनवा ,
वेदना कुणा ऊमजेना ॥

वासरू हंबरे गोठ्यात,
सडाशी लागल्या वेदना
सोडूनी चारा तो हिरवा ,
तान्हूला दिसे धावतांना ॥

मायेने घेऊन कुशीत ,
गाय सूखावे चाटतांना ,
मुख लागता वासराचे ,
बघा फुटे सडाला पान्हा ॥

कुस मायेची ऊबदार ,
नसे काळजी निजतांना ,
माऊली काळा पुढे ढाल ,
लेकरा साठी झुंजताना ॥

माय जगताची माऊली ,
माय आभाळाची सावली ,
माय हा अमृताचा घोट ,
रिते आभाळ माते विना ॥

माय ती डोंगराचा माथा ,
माय ती तळ सागराचा ,
माय लपवी तिच्या व्यथा ,
पदरा आड झाकतांना ॥

जगी तोच एक करंटा ,
विसरे माऊलींची माया ,
बंद होती सुखाच्या वाटा ,
अंधारी धडपडताना ॥

अशोक मु.रोकडे .
मुंबई.