१४-मे-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 14, 2023, 10:52:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०५.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "१४-मे-दिनविशेष"
                                   -----------------

-: दिनविशेष :-
१४ मे
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९७
देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची, साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. 'इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना' असे त्याचे नाव आहे.
१९६५
चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
१९६३
कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश
१९६०
मुंबई - न्यूयॉर्क
First Flight Cover
'एअर इंडिया'ची मुंबई - न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
१९५५
पोलंडमधील वॉर्सा येथे सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणाचा करार झाला. 'वॉर्सा करार' या नावाने ओळखला जाणारा हा करार 'नाटो करारा'ला प्रतिशह म्हणून करण्यात आला. हा करार १ जुलै १९९१ रोजी संपुष्टात आला.
१९४०
दुसरे महायुद्ध - हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१७९६
इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली. जेम्स फिलीप हा देवीच्या लशीचे संशोधक सर एडवर्ड जेन्नर यांच्या माळ्याचा मुलगा होता.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९९८
तरुणी सचदेव
तरुणी सचदेव – 'रसना'च्या जाहिरातीतील बालकलाकार
(मृत्यू: १४ मे २०१२)
१९२६
डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९९)
१९२३
मृणाल सेन – दिग्दर्शक
(मृत्यू: ३० डिसेंबर १९१८)
१९०९
वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित
(मृत्यू: ४ जुलै १९९९)
१९०७
फील्ड मार्शल आयुब खान – पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १९ एप्रिल १९७४)
१६५७
छत्रपती संभाजी महाराज
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज – मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती (१६ जानेवारी १६८१ ते ११ मार्च १६८९), छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव
(मृत्यू: ११ मार्च १६८९ - तुळापूर, पुणे)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
तरुणी सचदेव
'रसना'च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव हिचा नेपाळमध्ये विमान अपघातात मृत्यू
(जन्म: १४ मे १९९८)
१९९८
फ्रँक सिनात्रा
१९५७ मधील छायाचित्र
फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक
(जन्म: १२ डिसेंबर १९१५)
१९७८
जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक
(जन्म: १६ जुलै १९१७)
१९६३
भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य आणि राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले. वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे ते जाणकार होते.
(जन्म: ३० डिसेंबर १९०२)
१९२३
सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश (१९०१ -१९१२), मुंबई विधानपरिषदेचे बिनसरकारी अध्यक्ष (१९१९), डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष (१९०६), इंदूर संस्थानचे मुख्यमंत्री, प्रार्थना समाजाचे प्रमुख (१८९६), सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव (१९०१) आणि काँग्रेसचे एक संस्थापक व आजीव सभासद
(जन्म: २ डिसेंबर १८५५ - होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक)
१६४३
लुई (तेरावा)
लुई (तेरावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: २७ सप्टेंबर १६०१)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.05.2023-रविवार.
=========================================