दिन-विशेष-लेख-विश्व कुटुंबसंस्था दिन-A

Started by Atul Kaviraje, May 15, 2023, 10:20:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                 "विश्व कुटुंबसंस्था दिन"
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-15.05.2023-सोमवार आहे, 15 मे हा दिवस "विश्व कुटुंबसंस्था दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आज जागतिक कुटुंब दिन. १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. शांतता, विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करणारा नेमका दिवस असावा, म्हणून संयुक्त राष्ट्रांनी 'जागतिक कुटुंब' दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

     १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक करणाऱ्या महिलेने 'सिटीजन्स फॉर ग्लोबल सोल्युशन' या चळवळीद्वारे सलग १० वर्षे या दिनाचा जगभर प्रसार केला. जागतिक कुटुंब दिन, भारतातील कुटुंब व्यवस्था, सोशल मीडियाचा प्रभाव, याबद्दल जाणून घेऊया...

     international family day - know about history, significance and current situation of families

     आज जागतिक कुटुंब दिन. १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. शांतता, विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करणारा नेमका दिवस असावा, म्हणून संयुक्त राष्ट्रांनी 'जागतिक कुटुंब' दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक करणाऱ्या महिलेने 'सिटीजन्स फॉर ग्लोबल सोल्युशन' या चळवळीद्वारे सलग १० वर्षे या दिनाचा जगभर प्रसार केला. त्यांच्या चळवळीने जागतिक कुटुंब दिनाच्या सोहळ्यात विविध उपक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली. या चळवळीचे उद्दिष्टच मुळी 'एकत्र या, संवाद साधा, प्रोत्साहन द्या, संपर्क साधा' अशा असून, हे सारे कार्य जागतिक पातळीवरील सरकारे, विविध कार्यालये, संस्था यांच्यामार्फत व्हायला हवे, असा त्यांचा कटाक्ष असतो. 'ग्लोबल फॅमिली' ही न्यूयॉर्कमधली स्वयंसेवी संस्था संयुक्त राष्ट्राच्या या उपक्रमाला हिरीरीने हातभार लावत असते. भारतासारख्या कुटुंबवत्सल देशामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीची रुजवण फार प्राचीन काळापासून असल्याचे दिसते.

                    जागतिक कुटुंब दिनाची सुरुवात--

     करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात जागतिक कुटुंब दिन साजरा होत असल्याने त्याला एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. वास्तविक पाहता १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. खरे म्हणजे भारतासारख्या देशात कुटुंब दिन वगैरे रोजच साजरे होत असतात. भारतातील कुटुंब पद्धती, प्राचीन परंपरा, चालिरिती यांमुळे कुटुंबवत्सल देशात मुद्दाम कुटुंब दिन साजरा करावा लागत नाही.

                  हे विश्वचि माझे घर--

     मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर, ही भारतीय संस्कृती आहे. मात्र, परकीयांचे अंधानुकरण, सोशल मीडियाचा वाढता प्रचार, प्रसार, ट्रेंड यांमुळे भारतीय कुटुंब व्यवस्थेला वेगळीच दिशा मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळते. व्हॉट्स अॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरून नाईलाजाने किंवा अन्य काही कारणांमुळे विभक्त झालेली कुटुंबे पुन्हा एकदा आभासी जगाच्या माध्यामातून एकत्र आली आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर कौटुंबिक मैफिली रंगू लागल्या.

--देवेश फडके
-------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.05.2023-सोमवार.
=========================================