१९-मे-दिनविशेष-B

Started by Atul Kaviraje, May 19, 2023, 11:12:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०५.२०२३-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "१९-मे-दिनविशेष"
                                   -----------------

-: दिनविशेष :-
१९ मे
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००८
विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक
(जन्म: ७ जानेवारी १९२८ कोल्हापूर, महाराष्ट्र)
१९९९
प्रा. रमेश तेंडुलकर – काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक. सचिन तेंडुलकरचे वडील
(जन्म: ? ? १९३४)
१९९७
शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार, रंगभूमीचे 'भीष्माचार्य'
(जन्म: २२ ऑगस्ट १९१५)
१९९५
पं. विनयचंद्र मौदगल्य – ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ, त्यांनी १९३९ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची दिल्ली येथे स्थापना केली.
(जन्म: २ एप्रिल १९१८)
१९६९
पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर – इतिहास व पुराणसंशोधक, ताम्रपट व महानुभाव लिपितील तज्ञ, भारत इतिहास संशोधन मंडळात काम करत असताना 'शिवशाहीचा लेखनालंकार' हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.
(जन्म: ? ? ????)
१९६५
मालागासी येथील 'तुई मलिला' या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू
(जन्म: ?? १७७७)
१९५८
सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार
(जन्म: १० डिसेंबर १८७०)
१९०४
जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक
(जन्म: ३ मार्च १८३९)
१२९७
संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई हिने एदलाबाद येथे समाधी घेतली. [वैशाख व. १२, शके १२१९]
(जन्म: ? ? १२७९)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.05.2023-शुक्रवार.
=========================================