२३-मे-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 23, 2023, 10:16:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.०५.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                    "२३-मे-दिनविशेष"
                                   -----------------

-: दिनविशेष :-
२३ मे
जागतिक कासव दिन
World Turtle Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९७
माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
१९८४
बचेन्द्री पाल
बचेन्द्री पालने दुपारी १:०७ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 'एव्हरेस्ट'वरील प्रवासात २४,००० फूट उंचीवर तिच्या पथकाला एका मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. तरी शेवटी तिने एव्हरेस्ट सर केले. सरकारने तिला १९८४ मधे पद्मश्री पुरस्काराने, १९८६ मधे अर्जुन पुरस्काराने व नंतर २०१९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
१९५६
आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक संसदेत मंजूर झाले.
१९४९
पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
१८२९
सिरील डेमियनला 'अ‍ॅकॉर्डियन' या वाद्याचे पेटंट मिळाले.
१७३७
पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६५
वूर्केरी रमण – क्रिकेटपटू
१९५१
अनातोली कार्पोव्ह
१९६७ मधील छायाचित्र
अनातोली कार्पोव्ह – रशियन बुद्धीबळपटू. १९७५ मध्ये अमेरिकेच्या बॉबी फिशरला हरवून तो १२ वा विश्वविजेता बनला. १९८५ मध्ये गॅरी कास्पारॉव्हने त्याचा पराभव केला. [सर्वोच्च फिडे रेटिंग २७८० (जुलै १९९४)]
१९३३
मोहन वेल्हाळ – मुद्रितशोधन तज्ञ, कोणताही ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व सौष्ठवपूर्ण होण्यावर त्यांचा कटाक्ष असे. 'श्रीमान योगी', 'रुचिरा', 'स्वामी', 'राधेय' या पुस्तकांची संपूर्ण निर्दोष पुनर्निमिती त्यांच्या काकदृष्टीच्या मुद्रितशोधनामुळेच शक्य झाली.
१९२६
पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते
(मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
१९१९
महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता
(मृत्यू: २९ जुलै २००९)
१९१८
डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू, 'गोल्डन बॉय'
(मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
१८९६
केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक. 'अमृतमंथन', 'संत तुकाराम', ' कुंकू', 'माझा मुलगा', 'संत ज्ञानेश्वर', 'संत सखू' आदी बोलपटांतील गीतांच्या स्वररचना आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. 'एकलव्य' या टोपणनावाने त्यांनी 'वसुंधरा' या साप्ताहिकात अभिजात गायक-गायिकांविषयीचे लेख लिहिले. क्रिकेटवरही ते अभ्यासपूर्ण लेखन करत असत.
(मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७७)
१८७५
आल्फ्रेड पी. स्लोन – अमेरिकन उद्योगपती
(मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
१७०७
कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.
(मृत्यू: १० जानेवारी १७७८)
१०५२
फिलिप (पहिला) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: २९ जुलै ११०८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१७
रॉजर मूर – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता
(जन्म: १४ ऑक्टोबर १९२७)
२०१४
माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज
(जन्म: १ सप्टेंबर १९२१)
१९३७
जॉन डेव्हिसन रॉकफेलर – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक
(जन्म: ८ जुलै १८३९)
१९०६
हेन्‍रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी
(जन्म: २० मार्च १८२८)
१८५७
ऑगस्टिन कॉशी – फ्रेन्च गणितज्ञ
(जन्म: २१ ऑगस्ट १७८९)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.05.2023-मंगळवार.
=========================================