३१-मे-दिनविशेष-A

Started by Atul Kaviraje, May 31, 2023, 09:39:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३१.०५.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                     "३१-मे-दिनविशेष"
                                    -----------------

-: दिनविशेष :-
३१ मे
जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९२
प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा 'कबीर सन्मान' मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर. साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍यांना हा सन्मान देण्यात येतो.
१९९०
नेल्सन मंडेला यांना 'लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार'
१९६२
दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
१९६१
दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
१९५२
'संगीत नाटक अकादमी'ची स्थापना
१९४२
दुसरे महायुद्ध - जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.
१९३५
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्‍वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.
१९१०
दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६६
रोशन महानामा
रोशन सिरीवर्दने महानामा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि पंच
१९३८
वि. भा. देशपांडे
विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे – नाट्यसमीक्षक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी. त्यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. त्यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. वि.भा. देशपांडे यांची इ.स. २०१५ सालापर्यंत जवळपास ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पैकी नाट्यविषयक लेखनाची एकूण २५ पुस्तके आहेत. 'नाटकातली माणसं', 'गाजलेल्या भूमिका', 'नाटक नावाचं बेट', 'निळू फुले', 'नाट्यभ्रमणगाथा', 'निवडक नाट्यप्रवेश', 'वारसा रंगभूमीचा', 'आचार्य अत्रे: प्रतिभा आणि प्रतिमा' ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
(मृत्यू: ९ मार्च २०१७)
१९३०
क्लिंट इस्टवूड
For a few dollars more
क्लिंट इस्टवूड – अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक
१९२८
पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
(मृत्यू: ४ फेब्रुवारी २००१)
१९२७
वनराज भाटिया
वनराज भाटिया – प्रतिथयश संगीतकार. चित्रपट, रंगभूमी, जाहिराती तसेच दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतील संगीत समर्थपणे हाताळणारे कुशल संगीतकार, त्यांनी ७००० हुन अधिक जिंगल्सना संगीत दिले आहे (Liril, Dulux). अनेक दूरचित्रवाणी मालिकांचे पार्श्वसंगीत व शीर्षकगीत त्यांच्या नावावर आहे. शाम बेनेगल यांच्या अंकुर, भूमिका, सरदारी बेगम असे १६ चित्रपट व तमस ही मालिका यांचे संगीत किंवा पार्श्वसंगीत त्यांचे आहे.
(मृत्यू: ७ मे २०२१)
१९२५
राज खोसला
२०१३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
राज खोसला – १९५० ते १९८० या कालखंडातील आघाडीचे दिग्दर्शक, पटकथालेखक व निर्माते. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेऊन पार्श्वगायक बनण्याच्या हेतूने ते पंजाबातून मुंबईत आले होते. परंतु देव आनंदच्या सांगण्यावरून ते दिग्दर्शनाकडे वळले आणि गुरु दत्तचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सी. आय. डी. (१९५६), सोलवां साल (१९५८), बम्बई का बाबू (१९६०), एक मुसाफिर एक हसीना (१९६२), वह कौन थी? (१९६४), दो बदन (१९६६), दो रास्ते (१९६९), चिराग (१९६९), मेरा गाँव मेरा देश (१९७१), प्रेम कहानी (१९७५), नेहले पे दहला (१९७६), मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट होत. अभिनेत्रींमधील कलागुण उत्कृष्टपणे सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणून त्यांना Women's Director असे म्हणत. भारतीय चित्रपटसृष्टीत 'neo-noir' प्रवाहाची सुरुवात त्यांनी केली असे म्हणता येईल.
(मृत्यू: ९ जून १९९१)
१९१०
भा. रा. भागवत
भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, 'फास्टर फेणे' आणि 'बिपीन बुकलवार' या पात्रांचे जनक
(मृत्यू: २७ आक्टोबर २००१ - पुणे)
१७२५
अहिल्याबाई होळकर
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील अर्धपुतळा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – माळवा साम्राज्याच्या महाराणी, आपल्या साम्राज्यात त्यांनी औद्योगिकरणाला चालना दिली तसेच देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा जीर्णोद्धार केला.
(मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५ - इंदौर, मध्य प्रदेश)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.05.2023-बुधवार.
=========================================