३१-मे-दिनविशेष-B

Started by Atul Kaviraje, May 31, 2023, 09:41:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३१.०५.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                     "३१-मे-दिनविशेष"
                                    -----------------

क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००३
अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार
(जन्म: ७ जुलै १९१४)
२००२
सुभाष गुप्ते – लेग स्पिनर
(जन्म: ११ डिसेंबर १९२९)
१९९४
पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
(जन्म: २० जुलै १९२१ - वाराणसी)
१९७३
दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक. 'किशोरीचे हृदय', 'विद्या आणि वारुणी' ही कादंबरी, 'तोड ही माळ' हे नाटक व अनेक कथासंग्रह त्यांनी लिहीले.
(जन्म: १९ आक्टोबर १९०२ - गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)
१९१०
डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर
(जन्म: ३ फेब्रुवारी १८२१)
१८७४
भाऊ दाजी लाड
डॉ. रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, प्राचीनवस्तू संग्राहक, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी, ग्रँट मेडिकल कॉलेजच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी, मुंबईचे नगरपाल (१८६९ आणि १८७१). प्राचीन नाण्यांचा त्यांचा संग्रह बराच मोठा होता. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून १९७५ मध्ये 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम'चे नामकरण 'भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय' असे करण्यात आले.
(जन्म: ७ सप्टेंबर १८२२ - मांद्रें, पेडणें, गोवा)
४५५
रोमन सम्राट पेट्रोनिअस मॅक्झिमस (कार्यकाल: १७ मार्च ४५५ ते ३१ मे ४५५) याला संतप्त जमावाने दगडांनी ठेचून ठार केले
(जन्म: ? ? ३९६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.05.2023-बुधवार.
=========================================