०१-जून -दिनविशेष-A

Started by Atul Kaviraje, June 01, 2023, 09:22:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०६.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "०१-जून -दिनविशेष"
                                -------------------

-: दिनविशेष :-
०१ जून
आंतरराष्ट्रीय बाल दिन
दुर्ग दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००४
रमेश चंद्र लाहोटी यांनी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(कार्यकाल: १ जून २००४ ते ३१ ऑक्टोबर २००५)
२००३
थ्री गॉर्जेस धरण
पॅनोरमा
चीनमधील यांगत्से नदीवरच्या महाप्रचंड अशा 'थ्री गॉर्जेस' धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. १४ डिसेंबर १९९४ रोजी या धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली होती आणि डिसेंबर २०१५ मध्ये ते बांधून पूर्ण झाले.
२००१
नेपाळचे राजे वीरेन्द्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेन्द्र यांनी निर्घृण हत्या केली.
१९९६
भारताचे ११ वे पंतप्रधान म्हणून हरदनहळ्ळी दोड्डेगौडा तथा एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
(कार्यकाल: १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७)
१९६१
अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
१९५९
द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
१९४५
'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'ची स्थापना झाली
१९३०
दख्खनची राणी
मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
ही भारतातील पहिली 'सुपर फास्ट' गाडी आहे. 'ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे' या कंपनीची ही गाडी सुरुवातीला कल्याण-पुणे-कल्याण अशी धावत असे.
१९२९
प्रभात फिल्म कंपनी
विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील चार कलावंतांनी कोल्हापूर येथील एक सराफ सीतारामपंत विष्णु कुलकर्णी यांच्या आर्थिक साहाय्याने 'प्रभात फिल्म कंपनी'ची स्थापना केली. १३ ऑक्टोबर १९५३ रोजी ही कंपनी विसर्जित करण्यात आली.
१९१२
'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'ची स्थापना झाली
१८३१
सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर धृवाचे स्थान निश्चित केले.
१७९६
टेनेसी अमेरिकेचे १६ वे राज्य बनले.
१७९२
केंटुकी अमेरिकेचे १५ वे राज्य बनले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७०
आर. माधवन
२०१६ मधील छायाचित्र
रंगनाथन माधवन तथा आर. माधवन – तामिळ आणि हिंदी चित्रपटातील अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता
१९६५
नायगेल शॉर्ट – इंग्लिश बुद्धिबळपटू
१९३८
लीला माणिकचंद गांधी – नर्तिका व अभिनेत्री. ७५ चित्रपटात व २५ नाटकांत त्यांनी काम केलं. 'महाकवी कालिदास' या संस्कृत नाटकातही त्यांनी काम केलं होतं. 'कथा अकलेच्या कांद्याची'मधील त्यांची नृत्यं पाहून संगीतकार वसंत देसाई यांनी दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना सांगून 'आशीर्वाद' या हिंदी चित्रपटातील 'सवाल जवाब'साठी त्यांना बोलवलं. यातील लीलाबाईंचं नृत्य गाजलं.
१९३०
बाबासाहेब पांडुरंग तथा बाबा आढाव – सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते
१९२९
नर्गिस
लाजवंती (१९५८)
फातिमा रशिद ऊर्फ 'नर्गिस' दत्त – हिन्दी चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: ३ मे १९८१)
१९२६
पुरुषोत्तम दारव्हेकर – नाटककार व लेखक
(मृत्यू: २१ सप्टेंबर १९९९)
१९२६
मेरिलीन मन्‍रो
नॉर्मा जीन बेकर ऊर्फ मेरिलीन मन्‍रो – अमेरिकन अभिनेत्री
(मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)
१८७२
नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ 'कवी बी' – त्यांची 'चाफा बोलेना, चाफा चालेना ...' ही कविता खूप प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)
१८४२
सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)
(मृत्यू: ९ जानेवारी १९२३)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.06.2023-गुरुवार.
=========================================