०१-जून -दिनविशेष-B

Started by Atul Kaviraje, June 01, 2023, 09:23:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०६.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "०१-जून -दिनविशेष"
                                  --------------------

क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००६
माधव गडकरी
माधव यशवंत गडकरी – पत्रकार, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मुंबई सकाळ, गोमंतक इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक. १९९२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते मुंबई चौफेर या वृत्तपत्रात नियमित एक सदर लिहीत असत. पद्मश्री (१९९०)
(२५ सप्टेंबर १९२८)
२००२
हॅन्सी क्रोनिए
दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन
(जन्म: २५ सप्टेंबर १९६९)
२००१
नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या
(जन्म: २८ डिसेंबर १९४५)
२०००
मधुकर महादेव टिल्लू – एकपात्री कलाकार. यांनी एकपात्री प्रयोगांची नवी शैली निर्माण केली. प्रसंग लहान, विनोद महान (१५०० हून अधिक प्रयोग), हसायदान (१००० हून अधिक प्रयोग), 'जिंदादिल' मराठी शेरोशायरी (५०० हून अधिक प्रयोग), 'ह्युमर फ्रॉम प्रोफेशन' (३०० हून अधिक प्रयोग) असे अक्षरश: हजारो एकपात्री प्रयोग त्यांनी केले.
(जन्म: ? ? १९३३)
१९९८
गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व 'गडसम्राट'. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत' या त्यांच्या कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले.
(जन्म: ८ जुलै १९१६)
१९९६
नीलम संजीव रेड्डी
अधिकृत छायाचित्र (१९७७)
नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती (कार्यकाल: २५ जुलै १९७७ ते २४ जुलै १९८२), लोकसभेचे ४ थे सभापती (कार्यकाल: १७ मार्च १९६७ ते १७ जुलै १९६९ आणि २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७), केंद्रीय मंत्री व (अविभाजित) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (कार्यकाल: १ नोव्हेंबर १९५६ ते ११ जानेवारी १९६० आणि १२ मार्च १९६२ ते २० फेब्रुवारी १९६४), स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते
(जन्म: १९ मे १९१३ - इलुरू, तामिळनाडू)
१९८७
ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार
(जन्म: ७ जून १९१४)
१९८४
नाना पळशीकर – अभिनेते
(जन्म: २० मे १९०८)
१९६८
हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका
(जन्म: २७ जून १८८०)
१९४४
महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट, कलेला वाहून घेतलेल्या या चित्रकाराने सुमारे ५,००० हून अधिक चित्रे काढली.
(जन्म: १८ मार्च १८६७)
१९३४
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक
(जन्म: २९ जून १८७१)
१८६८
जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २३ एप्रिल १७९१)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.06.2023-गुरुवार.
=========================================