नंतर

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 03, 2023, 08:57:29 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

डाव खेळले प्रेमाचे कळते नंतर
कोण जवळ होते ते दिसते नंतर

गोड आठवणी जपल्या होत्या मी
त्या आठवणीत विष मिसळते नंतर

जपवून ठेवली मी जखम काळजावर
जखम ही काळजाची भळभळते नंतर

का विरह यातना माझ्या वाट्याला या
का विरहात माझ्या तू ही जळते नंतर

बघ मरण ही विचार करत आहे आता
सरणाजवळ माझ्या का ती रडते नंतर

कविराज..अमोल....
मो.७८२८८९५५५५ अहमदनगर