II वटपौर्णिमा II-कविता-1

Started by Atul Kaviraje, June 03, 2023, 05:24:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II वटपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०६.२०२३-शनिवार आहे. आज "वटपौर्णिमा" आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना वट -पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही कविता.

विचार आधुनिक जरी ,
श्रध्दा देवावर माझी
होईन सौ जेव्हा मी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..
असेल ऑफिस जरी,
वडपूजा जमणार नाही
डगाळ आणून घरी,
करेल वटपौर्णिमा साजरी..
एवढा आटापिटा ,
फक्त तुझ्या साथीसाठी
होऊन थोडी स्वार्थी ,
करेल वटपौर्णिमा साजरी..
विज्ञान म्हणते,
राखेत संपेल सर्वकाही
भोळे मन म्हणते,
तरीही...
एकच ' हा ' जन्म जरी ,
सावित्रीची लेक मी
अनंताच्या वाटेवरही
करेल तुला साथ मी....

--कवियेत्री - स्वप्ना
----------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सूत्र संचालन.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.06.2023-शनिवार.
=========================================