II वटपौर्णिमा II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, June 03, 2023, 05:29:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II वटपौर्णिमा II
                                  ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०६.२०२३-शनिवार आहे. आज "वटपौर्णिमा" आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना वट -पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.

     ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर येणारा पहिलाच सण म्हणजे वटपौर्णमा. महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो. अनेक ठिकाणी हा सण साजरा करण्यात येतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते. बाया एकत्र येऊन नवऱ्यासाठी खास उखाणे घेतात, काही बायका खास वटपौर्णिमा निमित्त बनवलेले उखाणे घेऊन नवीन पणा दाखवतात. आता सोशल मीडिया प्रस्थही खूपच वाढले आहे. वटपौर्णिमेचे फोटो शेअर करणे आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Vat Purnima Quotes In Marathi) देणे हादेखील एक अविभाज्य भाग बनला आहे. वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती असल्यास शुभेच्छा संदेश कसे  द्यावे हे या लेखात आहे. या लेखातून आम्ही तुमच्यासाठी खास वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश (Vat Purnima Greetings In Marathi) घेऊन आलो आहोत. तुम्हीही वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्या संदेशांनी (vat purnima msg for husband in marathi) खास करू शकता. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश (वटपौर्णिमा quotes marathi).

=========================================
1. मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
3. सात जन्माची साथ, हाती तुझा हात..वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
4. कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या, धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य...वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
5. मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची, पाळेन मी सात जन्म आणि देईन तुला साथ...वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
6. कायम राहो तुझी अशीच साथ, दीर्घायुष्य लाभो खास! वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
7. वटपौर्णिमेचा दिवस हा खास...लागून राहिली आहे साता जन्माची आस!
8. तुझ्याशिवाय आयुष्य जगणं सहनच होऊ शकत नाही. तुला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
9. वडाप्रमाणे तुझं आयुष्य असो आणि तुझं सुख असचं वडाच्या फांद्याप्रमाणे पसरत जावो ...वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
10. सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा...वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 
=========================================

--दीपाली नाफडे
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.06.2023-शनिवार.
=========================================