II वटपौर्णिमा II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, June 03, 2023, 05:30:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II वटपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०६.२०२३-शनिवार आहे. आज "वटपौर्णिमा" आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना वट -पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.

     हल्ली कोणताही सण असो शुभेच्छा स्टेटस हे महत्त्वाचे ठरतात. असे सोशल मीडियासाठी काही खास वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा स्टेटस (vat purnima quotes for husband in marathi) तुमच्यासाठी.

     वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेशाची गरज असते. वटपौर्णिमा हा सणही हल्ली खूपच खास झाला आहे. मराठीतून खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.

=========================================
1. सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू...वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
3. वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला, जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
4. मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
5. एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
6. प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची!
7. पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन,
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8. लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो पती – पत्नीची दृढ साथ ...वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
9. विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे
करूया वटपौर्णिमा साजरी
10. वटपौर्णिमेला सुवासिनी पूजतात वड
सावित्रीच्या आठवणीने होते अंतःकरण जड...वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

--दीपाली नाफडे
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.06.2023-शनिवार.
=========================================