II वटपौर्णिमा II-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, June 03, 2023, 05:33:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II वटपौर्णिमा II
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०६.२०२३-शनिवार आहे. आज "वटपौर्णिमा" आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना वट -पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.

     वटपौर्णिमेसाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शुभेच्छा संदेश पाठवू शकता. हा असा सण आहे जो आपण आपल्या मैत्रिणींसह अगदी मनापासून साजरा करतो. तिलाही द्या मनापासून शुभेच्छा.

=========================================
1. सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी| तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्| अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते | अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि || वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।
2. जसे सावित्रीने व्रत केले तसे आपलेही व्रत पूर्ण होवो...वटसावित्रीच्या शुभेच्छा
3. सुख – दुःखात कायम सोबत राहू, एकच नाहीतर सात जन्मात एकमेकांचे होऊ – वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
4. वटपौर्णिमा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
5. नाही केवळ सजण्याधजण्याचा हा सण...जन्मोजन्मीची आहे गाठ
वटपौर्णिमेच्या सणाचा आहे काही वेगळाच थाट...शुभेच्छा!
=========================================

--दीपाली नाफडे
---------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.06.2023-शनिवार.
=========================================