II वटपौर्णिमा II-उखाणे

Started by Atul Kaviraje, June 03, 2023, 05:36:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II वटपौर्णिमा II
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०६.२०२३-शनिवार आहे. आज "वटपौर्णिमा" आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना वट -पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वटपौर्णिमेसाठी उखाणे .

     वटपौर्णिमा हा असा सण आहे जिथे अनेक महिला एकत्र जमतात. एकमेकांची मस्करी करणं आणि अशावळी उखाण्यांमध्ये आपल्या नवऱ्यांचं नाव घेणे हे तर पूर्वपरंपरागत चालत आले आहे .हल्ली तर नवरदेवदेखील उखाणे घेतात ही वटपौर्णिमादेखील करा उखाण्यांनी खास.

                वटपौर्णिमेसाठी उखाणे--

=========================================
1. पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सदा वटपौर्णिमेच्या दिवशी.... रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा
2. सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न ....रावांसोबत झाले आताच माझे लग्न
3. वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी ..... रावांसाठी दिर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी
4. देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ..... रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ
5. भरझरी साडी जरतारी खण ..... रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण
6. जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी ...... रावांची साथ जन्मोजन्मी असावी
7. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे ..... रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे
8. आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मी मारते वडाला....रावांसारखे पती मिळावे म्हणून मागणे मागते देवाला
9. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते, ....रावांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे इच्छा हीच व्यक्त करते
10. वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस, ....रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस
=========================================

--दीपाली नाफडे
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.06.2023-शनिवार.
=========================================