०५-जून-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 05, 2023, 04:52:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.०६.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "०५-जून-दिनविशेष"
                                 -------------------

-: दिनविशेष :-
०५ जून
जागतिक पर्यावरण दिन
  पर्यावरणाची हानी करुन मानवाची होणारी प्रगती यासंबंधी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५ जून १९७२ रोजी एक परिषद भरली होती. आता हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिवस' (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो.
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९४
वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१९७७
सेशेल्समधे उठाव झाला.
१९७५
सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
१९५९
सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९१५
डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९०८
रवि नारायण रेड्डी – 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया'चे सहसंस्थापक
(मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)
१८८३
जॉन मायनार्ड केन्स
जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ
(मृत्यू: २१ एप्रिल १९४६)
१८८१
गोविंदराव टेंबे
गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक. 'अयोध्येचा राजा', 'अग्निकंकण', 'मायामच्छिंद्र' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.
(मृत्यू: ९ आक्टोबर १९५५)
१८७९
नारायण मल्हार जोशी Postage Stamp
नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक. यांच्या सन्मानार्थ १९८० मध्ये टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
(मृत्यू: ३० मे १९५५)
१७२३
अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता
(मृत्यू: १७ जुलै १७९०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००४
रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ६ फेब्रुवारी १९११)
१९९९
राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले
(जन्म: ? ? ????)
१९७३
माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक
(जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)
१९५०
हरिश्चंद्र बिराजदार
रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक, १९७० च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते
(जन्म: १४ सप्टेंबर २०११)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.06.2023-सोमवार.
=========================================