नाही रे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 08, 2023, 10:09:02 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

किती विसरावे म्हणतो तुला विसरता येत नाही रे
हळव्या मनाचे घाव कोणा दाखवता येत नाही रे

अजून सुचाव्या कविता तुझ्या माझ्या विरहाच्या
कवितेच्या ओळींत तुझं रूप मांडता येत नाही रे

किती पुरावे देऊ आता सांग तू शेवटच्या भेटीचे
त्या क्षणांना आठवून तुझ्याशी भांडता येत नाही रे

असा कोणता गुन्हा केला मी उध्वस्त सारं केलंस तू
डोळ्यांचं दुःख पापण्यांना ही दाखवता येत नाही रे

कोणी केलं दार उघडल मयत तुझ्या दारात असतांना
तुला पाहून कोणाला देहावर फुलं उधळता येत नाही रे

कविराज..अमोल
मो.७८२८८९५५५५
अहमदनगररे