कुणीतरी असलं पाहिजे...

Started by prachidesai, October 07, 2010, 10:22:21 PM

Previous topic - Next topic

prachidesai

कुणीतरी असलं पाहिजे...
कुणीतरी असलं पाहिजे...
कुणीतरी असलं पाहिजे...
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..

सकाळी घरातून बाहेर पडताना
"लवकर ये" असं सांगायला...
मीटिंग मधून बाहेर आल्यावर
"back" असा मेसेज टाकायला...
"कंटाळा आलाय" हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला...


इच्छित स्थळी पोचल्यावर
"सुखरूप पोचले" चा फोन करायला....
ट्रेक साठी जाताना "फार भिजू नकोस"
असं बजावायला...

उशीर होत असेल, तर
"जेवून घ्या" असं सांगायला....
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला...

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला...
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला.....

..............................स्वप्निल