दिन-विशेष-लेख-जागतिक रक्तदान दिन

Started by Atul Kaviraje, June 14, 2023, 02:00:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                               "जागतिक रक्तदान दिन"
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-14.06.2023-बुधवार आहे. १४-जून हा दिवस "जागतिक रक्तदान दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात येतो.

     आज 'जागतिक रक्तदाता दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व--

     जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे आहे.

     रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात येतो. रक्तासह जटिल वैद्यकीत आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेस समर्थन देता येते.

                   जागतिक रक्तदान दिनाचे महत्व :--

     जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे आहे. हा दिवस ऐच्छिक, न चुकता रक्तदात्यांचे जीवन वाचवणाऱ्या भेटवस्तूंसाठी आभार मानण्याचा एक प्रसंग आहे.

                   जागतिक रक्तदान दिन 2022 ची थीम :--

     दरवर्षी जागतिक रक्तदान दिनानिमित्त वेगळी थीम ठेवली जाते. या वर्षाची थीम आहे..."रक्तदान हे एकतेचे कार्य आहे. प्रयत्नात सामील व्हा आणि जीव वाचवा." या थीमचे उद्दिष्ट आहे की लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आणि समुदायांमध्ये लोकांना रक्तदान करण्यास जागृत करणे तसेच त्यांना या प्रक्रियेत सामील करून घेणे असा आहे.   

                   जागतिक रक्तदान दिनाचा इतिहास :--

     जागतिक आरोग्य संघटनेने 2005 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज यांच्या संयुक्त पुढाकाराने 2005 मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा दिवस कार्ल लँडस्टेनरच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो.

By: एबीपी माझा वेब टीम
Edited By: प्रिया मोहिते
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.abp लाईव्ह.कॉम)
                    ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.06.2023-बुधवार.
=========================================