२०-जून-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 20, 2023, 05:04:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०६.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                   "२०-जून-दिनविशेष"
                                   ------------------

-: दिनविशेष :-
२० जून
आंतरराष्ट्रीय निर्वासित दिन
जागतिक स्वच्छता दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
१९९७
'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी'तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
१९६०
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना
१९२१
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना
१८९९
केंब्रिज विद्यापीठाच्या 'ट्रायपॉस' या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१८८७
देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.
१८६३
वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.
१८३७
व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७२
पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू
१९५४
अ‍ॅलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू
१९३९
रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष
(मृत्यू: २८ एप्रिल १९९८)
१९१५
टेरेन्स यंग
स्टुअर्ट टेरेन्स हर्बर्ट यंग – आयरिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथाकार. 'डॉक्टर नो', 'फ्रॉम रशिया विथ लव्ह' आणि 'थंडरबॉल' या बॉन्डपटांचे दिग्दर्शक
(मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४ - केन्स, फ्रान्स)
१८६९
लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक
(मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००८
चंद्रकांत गोखले – अभिनेते
(जन्म: ७ जानेवारी १९२१)
१९९७
वासुदेव वामन तथा 'भाऊसाहेब' पाटणकर ऊर्फ 'जिंदादिल' – मराठीतले पहिले शायर
(जन्म: २९ डिसेंबर १९०८)
१९९७
बासू भट्टाचार्य – चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: ? ? १९३४)
१८३७
विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१६६८
हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक
(जन्म: १८ डिसेंबर १६२०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.06.2023-मंगळवार.
=========================================