Juice Packet

Started by mkapale, June 22, 2023, 07:53:21 AM

Previous topic - Next topic

mkapale

तू मला फेकून दिलस
आयुष्यातून तुज्या सहज
Juice पिऊन पॅकेट
फेकतात चुरगाळून तसं

मी ठरवलं कि Recycle
झालो कि परत यायचं
तुज्याच हातात रागाने
बनून कडू Juice जसं

पण...

प्रेम आहे तुझ्यावर इतकं
कि जितक्या वेळा येईन
तुज्या ओठांवर रेंगाळींन
गोड उसाचा रस असतो तसं

फरक हाच आहे आपल्यात
तू मला पाहिलं गरज म्हणून
आणि मी वेडा झालो प्रेमात
झंजावात यावं समुद्रात जसं