थांब जरासं

Started by amoul, October 08, 2010, 10:15:04 AM

Previous topic - Next topic

amoul

आयुष्याच्या वाटेवर नेमकं कुठे थांबावं ते कळायला हवे, नाहीतर धावपळ  हि सुरूच असते. या ईच्छा अपेक्षेच्या वाटेवर जीव अर्ध्यातच संपतो नि मेल्यावर हि कदाचित त्यची फरफट होत असेल, ते होऊ नये म्हणून थांब जरासं


जगताना थोडा वेळ भेटलाच तर,
कसा जगलास याचा विचार कर.
चाललास किती, अडखळलास  कधी,
धावलास किती, पडलास कधी.
आणि झालं असं किती वेळ,
नीट मांड याचा मेळ.
मग ठरव अजून सुद्धा नाही आली का वेळ ती,
थोडसं थांबण्याची, थोडी घेण्या विश्रांती.

अखंड असते वाट पसरलेली जीवनाची,
तिच्यावर असतात सतत  प्रवास आणि प्रवाशी,
तिचा संबंद्ध केवळ असतो या दोघांशी.
पण चालताना प्रवाशी संपतो प्रवास नाही,
मनात उरतात नंतरसुद्धा ईच्छा अपेक्षा काही.
तळमळ होते जीवाची आणि घालमेल वाढते,
तो चालल्या वाटेवरती कोमेजतात फुले उरतात काटे.

म्हणून म्हणतो प्रवासात थांबायचे ठिकाण ठरवून घे,
कारण सोबतीला सुख आणि दुखही असतील दोघे.
म्हणून प्रवाशी संपायच्या आत प्रवास संपलेला बरा,
म्हणजे समाधानात सदा हसेल चेहरा.
तेव्हाच मनात बाकी उरणार नाही काही,
निच्छींत मरताही येईल नि जीवही हुरहुरणार नाही.

........अमोल