२७-जून -दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 27, 2023, 05:17:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२७.०६.२०२३-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे"दिनविशेष"

                                  "२७-जून -दिनविशेष"
                                 --------------------

-: दिनविशेष :-
२७ जून
हेलन केलर दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ------------------
१९९६
अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'चा 'चिंतामणराव देशमुख पुरस्कार' जाहीर
१९९१
युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
१९७७
जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५४
अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलोवॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.
१९५०
अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  --------------------------------
१९३९
राहूलदेव बर्मन तथा 'पंचमदा' – संगीतकार
(मृत्यू: ४ जानेवारी १९९४)
१९१७
खंडू रांगणेकर
खंडेराव मोरेश्वर ऊर्फ 'खंडू' रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज
(मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)
१८८०
हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका
(मृत्यू: १ जून १९६८)
१८७५
दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ 'कवी दत्त'
(मृत्यू: १३ मार्च १८९९)
१८६४
शिवराम महादेव परांजपे – 'काळ' कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
(मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)
१८३८
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या 'आनंदमठ' या कादंबरीत 'वंदे मातरम' हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली.
(मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१५५०
चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: ३० मे १५७४)
१४६२
लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: १ जानेवारी १५१५)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -----------------------------
२०१६
ऑल्विन टॉफलर
ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार, भविष्यवेत्ता व लेखक
(जन्म: ४ आक्टोबर १९२८
२००८
सॅम माणेकशा
२००८ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
फील्ड मार्शल सॅम होर्मुसजी जमशेदजी फ्रामजी उर्फ 'सॅम बहादूर' माणेकशा – स्वतंत्र भारताचे ७ वे लष्कर प्रमुख (८ गोरखा रायफल्स), पद्मविभूषण (१९७२), पद्मभूषण (१९६८), मिलिटरी क्रॉस (१९४२)
(जन्म: ३ एप्रिल १९१४ - अमृतसर, पंजाब, ब्रिटिश इंडिया)
२०००
दत्तात्रेय नरसिंह गोखले– चरित्र चिंतक, चरित्र वाङ्‌मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.
(जन्म: २० सप्टेंबर १९२२)
१९९८
होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार
(जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
१९९६
अल्बर्ट आर. ब्रोकोली – 'जेम्स बाँड' पटांचे निर्माते
(जन्म: ५ एप्रिल १९०९)
१८३९
महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक
(जन्म: १३ नोव्हेंबर१७८०)
१७०८
धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती
(जन्म: ? ? १६५०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.06.2023-मंगळवार.
=========================================