II देवशयनी आषाढी एकादशी II-चारोळ्या-1

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:26:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II देवशयनी आषाढी एकादशी II
                             -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त काही चारोळ्या.   

     आषाढी एकादशीला अत्यंत महत्व आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. श्री विठ्ठल समस्त वारकरी सांप्रदायिकांसह सर्वांचेच आवडते दैवत असल्याने करोनाच्या अडसरानंतर यंदाची एकादशी भाविकांसाठी उदंड उत्साहाची ठरणार आहे. यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर येथे गेल्या आहेत. ज्यांना पंढरपुरात जाणे शक्य नाही, त्यांची उपस्थिती स्थानिक परिसरात होणाऱ्या सार्वजनिक उत्साहात असेल. यंदा एकादशीच्या दिवशी भाविकांची उसळणारी गर्दी विचारात घेऊनच मंदिरांच्या वतीने नियोजन केले जाते आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने भावीक आणि वारकरी उत्साही झाले आहेत.

=========================================
"सुखासाठी करिसी तळमळ,
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,
मग तू अवघाची सुखरूप होसी,
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।"

"सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!"

"टाळ वाजे, मृदुंग वाजे,
वाजे हरीच्या वीणा !
माऊली निघाले पंढरपुरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला...!
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा..."

"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा"

"अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग...
देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा"

"दिसे रिंगण
टाळ मृदुंगाची धून
रिते तुझे वैकुंठ पांडुरंगा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा"

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवो निया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा"

"विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत...
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा"

"तुझा रे आधार मला,
तूच रे पाठीराखा,
तूच रे माझ्या पांडुरंगा,
चुका माझ्या देवा,
घे रे तुझ्या पोटी,

तुझे नाम ओठी सदा राहो,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...!"
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================