II देवशयनी आषाढी एकादशी II-चारोळ्या-2

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:28:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                II देवशयनी आषाढी एकादशी II
                               ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त काही चारोळ्या.   

     आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी किंवा देवशयनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

=========================================
तुला साद आली तुझ्या लेकरांची
लंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

यंदा महमारीने चुकलिया वारी ,
येऊ शकलो नाही तुझ्या दारी ,
दुःख वाटते मनात ओढ लगे जिव्हारी ,
एकच मागणे मागतो तुझ्या चरणी हा वारकरी
पुन्हा सुखाचे दिवस येऊदे घरो घरी
आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय

"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली

बोला पुंडलिका वर दे हरि विठ्ठल,
श्री ज्ञानदेवतेकर्म,
पंडरी नाथ महाराज की जय
विठ्ठल विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हरि ओम विठ्ठला
=========================================

--Marathi Sagar
------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्रीयन.इन)
                          ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================