II देवशयनी आषाढी एकादशी II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 12:01:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                               II देवशयनी आषाढी एकादशी II
                              ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त शुभेच्छा. 

     आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसह पायी चालणारी दिंडी, चंद्रभागेच्या काठावर दुमदुमणारा टाळ नाद, भोळ्या भाबड्या भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी असलेली आस आणि विठ्ठल माऊलीचे भक्ताला प्रेमपान्हा पाजणारे मनोहर रूप. भारतीय कालदर्शिकेनुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात. वर्षभरातील ही एक महत्त्वाची एकादशी असते. सध्या कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग मुळे असं करणं शक्य नसलं करी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadi Ekadashi Wishes In Marathi) शक्य आहे. यासाठीच आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha In Marathi) आणि आषाढी एकादशी खास कोट्स (Ashadi Ekadashi Quotes In Marathi) नक्की शेअर करा. त्यासोबतच कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ही शेअर करा.

                    आषाढी एकादशीच्या शुभेच्छा--

     आषाढी एकादशीला पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले जाते. महाराष्ट्रात आजवर अनेक संत होऊन गेले. यासाठीच आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी मनात घोळवत ठेवा संताचे हे अभंग आणि सुविचार.

=========================================
विश्वी विसावला तो विठ्ठल – सदगुरू श्री वामनराव पै

हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा – संत ज्ञानेश्वर

पंढरीचा राजा उभा भक्तराजा, उभारूनि भुजा वाट पाहे – संत नामदेव

अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पाडुरंग – संत चोखामेळा

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर ह्रदयी माझ्या
आणिक काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पाडुंरंगा – संत तुकाराम

अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग – संत सोयराबाई

ताल वाजे, मुदूंग वाजे, वाजे हरिची वीणा, माऊली निघाली पंढपपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सुखासाठी करिसी तळमळ, तरि तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मी दुःख विसरसी – संत नामदेव

रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर – संत ज्ञानेश्वर

नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबासी वाहू..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

येई गा तु मायबापा पंढरीच्या राया, तुजविण क्षिण क्षिण झाली काया...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
हेचि व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास – संत तुकाराम
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================