II देवशयनी आषाढी एकादशी II-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 12:07:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II देवशयनी आषाढी एकादशी II
                                ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त शुभेच्छा. 

     आषाढी एकादशीच्या आनंद आणि उत्साहात भर टाकण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना व्हॉटसअप मेसेज, शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha)संदेश पाठवण्याची सध्या पद्धत आहे. तेव्हा आषाढी एकादशीचे मेसेज (Ashadhi Ekadashi Messages In Marathi) पाठवून करा आजचा दिवस साजरा.

                    आषाढी एकादशीच्या शुभेच्छा--

=========================================
हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन शुद्ध भावे...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे....आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी....आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणिकाचे काम नाही येथे...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला, कंठ हा सोकला आळविता...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

गुणा आला ईटेवरी, पीतांबरधारी सुंदर तो,डोळे कानन त्याच्या ठायीं, मन पायीं राहो हें...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

गुरू माता गुरू पिता, गुरू आमुची कुळदेवता, थोर पडतां साकडे, गुरू रक्षी मागें पुढे...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जाऊ देवांचिया गावां, देव देईल विसांवा...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा... आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो...आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव, ह्रदयी पंढरिराव राहतसे... आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
=========================================

--तृप्ती पराडकर
---------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                         ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================