II देवशयनी आषाढी एकादशी II-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 12:14:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II देवशयनी आषाढी एकादशी II
                             -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त शुभेच्छा. 

                          आषाढी एकादशीच्या शुभेच्छा--

              आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि कोट्स--

     विठुरायाचं वेड आणि पायी वारी हे जगातलं एकमेवाद्वितीय आश्चर्य आहे ! देशी परदेशी निरीक्षकांना, अभ्यासकांना कुतूहल वाटणारा हा चमत्कार आहे. ही वारी यंदा चुकली त्यामुळे वारकऱ्यांचे मन थाऱ्यावर नाही, पण युगानुयुगे कर कटावर ठेऊन चंद्रभागे तिरी उभा असलेला विठुराया प्रत्येक सजीवाच्या हृदयात विराजमान आहे. त्याचे तिथेच मनोमन दर्शन घेऊन उद्भवलेल्या संकटाला नामशेष करण्याची प्रार्थना करूया...!!

=========================================
"चैतन्याचा गाभा... विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही
मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
रखूमाईवर
उभा विटेवर
कर कटेवर ठेऊनिया
भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता"

टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला...! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा... !

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...!

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी..., आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

"जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा..."

चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी!आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग... देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

"दाटलासें कंठ
रिते वाळवंट...पाहुनिया"

तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...!

रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

--माझी मराठी
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझी मराठी.कॉम)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================