II देवशयनी आषाढी एकादशी II-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 12:16:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II देवशयनी आषाढी एकादशी II
                              ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त शुभेच्छा. 

                 आषाढी एकादशीच्या शुभेच्छा--

सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।

=========================================
"दिसेना रिंगण
नाही टाळ मृदुंगाची धून
रिते तुझे वैकुंठ
पांडुरंगा"

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।, तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।

जरी बाप साऱ्या जगाचा, परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।

"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय"

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

"सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी..."

विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास, सार्‍या विठू भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पहिली शोधोनी अवघी तीर्थे, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

पालख्यांचा सोहळा नाही, वारकऱ्यांचा मेळा नाही, तो दरवर्षीचा आनंद सोहळा नाही, पण हा विठुराया यंदा आपण कित्येकांच्या रूपात उभा पाहिला, अविरत रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर च्या रूपात...निरंतर स्वच्छता ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या रूपात...हो नां त्यांच्यात दिसलाच की आपल्याला पांडुरंग !!!
=========================================

--माझी मराठी
---------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझी मराठी.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================