बकरी ईद-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:29:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "बकरी ईद"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही बकरी ईद शुभेच्छा.

     बकरी ईदच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा ईदचा आनंद.

    रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनंतर बकरी ईद (Bakra Eid) येते. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असतं. या दिवशी बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा आहे. इस्लाम धर्मानुसार रमजानच्या सेलिब्रेशननंतर बकरी ईदचं विशेष महत्त्व असतं. मग या दिवसाचं औचित्य साधून तुमच्या मुस्लीम मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) , फेसबूक (Facebook) मेसेज आणि स्टेट्सच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्र, HD Images, GIFs,मेसेजेस शेअर करून या सणाच्या नक्की शुभेच्छा द्या.

     बकरी ईद दिवशी खास मटण रेसिपींचा आस्वाद घेतला जातो. महाराष्ट्रामध्ये बकरी ईदचा सण धूम धडाक्यात साजरा केला जातो. पण यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही पावसाने थैमान घातल्याने कुर्बानी ऐवजी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

     मुस्लिम मान्यता अनुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईल ला याच दिवशी अल्लाह च्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाह ने हजरत इस्माइलला जीवनदान दिले. त्याच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पर्व साजरा केला जातो.

                  बकरी ईद मुबारक शुभेच्छा--

=========================================
धर्म, जात यापेक्षाही मोठी

असते शक्ती माणुसकीची...

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची

ईद मुबारक!



सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा...

बकरीद मुबारक!



माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना

बकरी ईद च्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा...

अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,

हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये...

आमीन!

ईद मुबारक



ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो

ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

बकरी ईद मुबारक!
=========================================

--Dipali Nevarekar
---------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.लेटेस्टली.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================