घेराव

Started by futsal25, October 12, 2010, 12:23:50 PM

Previous topic - Next topic

futsal25

हृदयावर तू दिलेला घाव आहे
कोरलेले त्यावर तुझे नाव आहे

आसवांना तू दिले परिमाण माझ्या
घेतला तू या मनाचा ठाव आहे

ही चर्चा तुझ्या रुपाची रंगलेली
बोलणारा वासनांध जमाव आहे

मी कशाला काळजी करु यातनांची
यातनांचा मज बराच सराव आहे

मागणे त्यांचे असे काहीच नाही
घातला त्यांनी तरी घेराव आहे



- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  :-X  ;)  8)  :D

amoul