माझ्या काही चारोळ्या

Started by futsal25, October 12, 2010, 12:28:25 PM

Previous topic - Next topic

futsal25

हल्ली एकटा असलो की
स्वत:लाच प्रश्न विचारतो
खोचक, बोचरे, अवघड
पण उत्तरे देण्याचे टाळतो. १
--------------------------
तुझ्या आठवांचे
तुषार फुलले,
ह्रुदयात खोलवर
काहीरी हलले. २
--------------------
मी असा कोणता
केला होता गुन्हा
शिक्षा ज्याची मला
मिळते पुन्हा पुन्हा. ३
------------------------
सायंकाळी कातरवेळी पक्षी
अपुल्या घरटी पळती
पाउले माझीही सहजच
परतीच्या वाटेवर वळती. ४
---------------------------
तुझ्यापासुन दूरजाण्यापूर्वी
मला एकच करायचाय
तुला डोळेभरुन पाहताना
ह्रुदयात साठवायचाय. ५
------------------------
माझ काय अस मोठ
मागण होत,
जगू द्या, एवढच
गा-हाण होत. ६
----------------------------
माणसा-माणसांत प्रेम असावे
नकोत नुसती नाती
माणुसकी, जिव्हाळा, सद्भावना
आपुलकी, असावी सांगाती. ७
-----------------------------
माझ्या प्रत्येक शब्दात
राणी, अर्थ तू शोधू नको,
माझ्या प्रत्येक कृतित
राणी, स्वार्थ तू शोधू नको. ८


- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  :-X  :'(  ;)  ;D  :D