पाऊस नवा

Started by शिवाजी सांगळे, July 01, 2023, 10:56:31 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाऊस नवा

पाऊस नवा का दरवेळी वाटतो
कुणाच्यातरी दारावर कोसळतो

वास्तवात असो वा आठवणीत
उगाच का दरवर्षी नवा भासतो

अंगण, शाळा अन् कॉलेज मधे
तोही हुशार, वेगवेगळाच पडतो

संदर्भात असतो, तो ओलाचिंब
नकळत प्रत्येक मनात रेंगाळतो

आठवते जेव्हा छत्री नी रेनकोट
पाऊस पुन्हा अडगळीत भेटतो

सफर घडवतो, साऱ्या स्मृतींची
म्हणून पाऊस नवा नवा वाटतो

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९