०३-जुलै-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 04:54:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "०३-जुलै-दिनविशेष"
                                 -------------------

-: दिनविशेष :-
०३ जुलै
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००६
एक्स.पी.<sub>१४</sub>
XP14 as seen on 3 July 2006
एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला. अगदी अलीकडेच म्हणजे १० डिसेंबर २००४ रोजी या लघुग्रहाचा शोध लागला होता.
२००१
सुधीर फडके यांना राज्य सरकारचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर
२०००
आय. एन. एस. विक्रांत
आय. एन. एस. विक्रांत (R11) या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी? मान्यता दिली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटनने १९४७ साली सेवेतून काढून टाकलेली ही युद्धनौका भारताने १९५७ मध्ये खरेदी केली आणि ४ मार्च १९६१ रोजी ती भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली. ३१ जानेवारी १९९७ पर्यंत ती नौदलाच्या सेवेत होती.
१९९८
'ए मेरे वतन के लोगो ...' या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
१९३८
मॅलार्ड ४४६८
मॅलार्ड ४४६८
'मॅलार्ड' हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे. सद्ध्या वाफेची इंजिने बनवत नाहीत हे ही त्यामागचे एक कारण असावे.
१८९०
आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.
१८८६
जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
१८८४
डाऊ जोन्स (DJIA) हा अमेरिकेच्या शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१८५५
भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
१८५०
कोहिनूर
इंग्लंडच्या राणीच्या मुकुटातील कोहिनूर हिरा
इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला 'कोहिनूर' (कोह-इ-नूर = Mountain of Light) हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
१८५२
महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
१६०८
सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९८०
हरभजनसिंग
हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू
१९७६
हेन्‍री ओलोंगा – झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू
१९५१
सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९२६
सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक, पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी
(मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)
१९२४
सेलप्पन रामनाथन – सिंगापूरचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
१९१४
दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार
(मृत्यू: ५ जानेवारी १९९२)
१९१२
श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट
(मृत्यू: १६ जून १९७७)
१९०९
बॅरिस्टर व्ही. एम. तथा 'भाऊसाहेब' तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ
(मृत्यू: २२ मार्च २००४)
१८८६
रामचंद्र दत्तात्रय तथा 'गुरूदेव' रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
(मृत्यू: ६ जून १९५७)
१८३८
मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक
(मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९६
राजकुमार
भरा
कुलभूषण पंडित तथा 'राजकुमार' ऊर्फ 'जानी' – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता
(जन्म: ८ आक्टोबर १९२६)
१९६९
ब्रायन जोन्स – 'द रोलिंग स्टोन्स'चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक
(जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)
१३५०
संत नामदेव यांनी समाधी घेतली.
(जन्म: २९ आक्टोबर १२७०)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार.
=========================================