II गुरुपौर्णिमा II-लेख-1

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 04:56:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरु-पौर्णिमेवर काही महत्त्वाचे माहितीपूर्ण लेख.

     गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः गुरूशिवाय ज्ञान नाही, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. गुरूशिवाय माणूस अज्ञानी राहतो. गुरु शिष्याच्या जीवनातील अंधार दूर करतात. ज्ञान मिळवण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंची सेवा आणि उपासना केली पाहिजे.

     पौर्णिमा तिथी दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते. अशा प्रकारे 3 जुलै ही आषाढ पौर्णिमा आहे. याला गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023) असेही म्हणतात. या दिवशी वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला. म्हणून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी पूजेबरोबरच गुरूंचीही सेवा केली जाते. गुरूशिवाय ज्ञान नाही, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. गुरूशिवाय माणूस अज्ञानी राहतो. गुरु शिष्याच्या जीवनातील अंधार दूर करतात. ज्ञान मिळवण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंची सेवा आणि उपासना केली पाहिजे. गुरूंच्या आशीर्वादाने व्यक्ती जीवनात उच्च स्थान प्राप्त करते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची भक्तिभावाने पूजा व सेवा करावी. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेची शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व.

                गुरु पौर्णिमा 2023 तारीख--

     पंचांगानुसार, यावर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा 2 जुलै 2023 रोजी रात्री 8.21 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 3 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5.08 वाजता समाप्त होईल. उदय तिथी वैध असल्याने, या वर्षी गुरुपौर्णिमा सोमवार, 3 जुलै 2023 रोजी साजरी केली जाईल.

                   पूजा पद्धत--

     हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या तिथीला ब्रह्मबेलामध्ये उठल्यानंतर सर्वप्रथम भगवान विष्णू आणि वेदांचे निर्माते वेद व्यास यांना नमस्कार करावा. दैनंदिन विधी आटोपल्यावर गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. आतां नवे वस्त्र परिधान करून आचमन करा. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यावेळी खालील मंत्राचा जप करा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः

     यानंतर भगवान विष्णू आणि वेद व्यास यांची फळे, फुले, धूप, दीप, अक्षत, हळद, दुर्वा इत्यादींनी पूजा करावी. गुरु चालिसा आणि गुरु कवच पठण करा. शेवटी प्रार्थना करून सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान, सुख, समृद्धी, कीर्ती मिळावी मागावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञान शोधणार्‍या व्यक्तीने देवी सरस्वती आणि त्यांच्या गुरूंची पूजा करावी. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा करावी. यासोबत आपल्या कुवतीनुसार दान आणि भेटवस्तू देऊन आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळवावे.

--नितीश गाडगे
--------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-tv ९ मराठी.कॉम)
                         ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार.
=========================================