II गुरुपौर्णिमा II-लेख-9

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:19:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरु-पौर्णिमेवर काही महत्त्वाचे माहितीपूर्ण लेख.

     आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला आषाढी पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी गुरुची पूजा केली जाते. यावेळी गुरुपौर्णिमा ही ३ जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे.

     आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आशीर्वादासोबतच धन, सुख व शांती याचे वरदान आपल्याला मिळू शकते. या देवशी व्यासमूनीचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते.

     हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेचे विशेष महत्त्व (Importance) सांगण्यात आले आहे. गुरूचे स्थान हे जीवनात श्रेष्ठ मानले जाते. गुरू हा देवापेक्षाही मोठा असतो. कारण माणसाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवणारा गुरुच असतो. यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष योग (Yog) होत आहे. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि शुभ योग.

         1. गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त (Guru Purnima 2023 Shubh Muhurt )--

सुरुवात - २ जुलै २०२३ रोजी रात्री ८ वाजून २२ मिनीटांपासून ते

समाप्ती - ३ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजून ९ मिनीटांपर्यंत

           2. गुरु पौर्णिमा 2023 महत्व (Guru Purnima 2023 Importance )--

     महर्षी वेदव्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला असे मानले जाते. हिंदू धर्मात महर्षी वेदव्यास यांना प्रथम गुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे कारण ते मानव जातीला वेद शिकवणारे पहिले होते. याशिवाय महर्षी वेद व्यास यांना श्रीमद भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा याशिवाय 18 पुराणांचे लेखक मानले जाते. यामुळेच महर्षी वेद व्यास यांना आदिगुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते.

             3. गुरुपौर्णिमा शुभ योग ( Guru Purnima 2023 Shubh Yog )--

     यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्मयोग आणि इंद्र योग तयार होतील. त्याचबरोबर सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होणार आहे. ब्रह्मयोग 02 जुलै रोजी संध्याकाळी 07.26 ते 03 जुलै दुपारी 03.45 मिनिटांनी असेल. इंद्र योग 03 जुलै रोजी दुपारी 03:45 वाजता सुरू होईल आणि 04 जुलै रोजी सकाळी 11:50 वाजता समाप्त होईल.

              4. गुरु पौर्णिमा पूजन पद्धत (Guru Purnima 2023 Puja )--

या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.

यानंतर पूजेचे व्रत घ्या आणि स्वच्छ ठिकाणी पांढरे वस्त्र पसरून व्यासपीठ ठेवा.

यानंतर त्यावर गुरु व्यासांची मूर्ती स्थापित करून त्यांना कुंकू, चंदन, फुले, फळे आणि प्रसाद अर्पण करा.

गुरु व्यासांसोबतच शुक्रदेव आणि शंकराचार्य इत्यादी गुरुंना बोलावून "गुरुपरंपरसिद्धयर्थं व्यासपूजन करिष्ये" या मंत्राचा जप करा.

--कोमल दामुद्रे
--------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-साम tv.कॉम)
                        ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================