II गुरुपौर्णिमा II-कविता-2

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:22:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुरुपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरु-पौर्णिमेवर काही कविता.

     गुरु पौर्णिमेच्या सदगुरुंच्या कविता-गुरु पौर्णिमे निमित्त सदगुरुंच्या कविता आम्ही येथे प्रस्तुत करत आहोत. सदगुरुंच्या साधक अवस्थेतील त्यांचा आपला अनुभव आणि त्यांच्यावर गुरुकृपा झाली त्याक्षणीचा अनुभव ह्या कवितांमधून ओतप्रोत झालेला आहे याची प्रचीती वाचकांना येईल.

               Sadhguru's Poem "My Master"--
              -----------------------------------

माझे गुरु
हरलो! हात टेकलेले मी
जीवन आणि मृत्यूच्या खेळापुढे

दोन्ही खेळ खेळलो मी
पण ढिम्म हललो नाही..

आणि अचानक एक माणूस
माझ्यापाशी येतो,
तो काठी टेकत चालणारा
मी नवयुवकासारखा सुदृढ

सगळं पाहून चुकलेलो  मी
जन्म - मृत्यू आणि
जे जे म्हणून जीवन बहाल करतं, ते सगळं काही ..

तरी सुन्न बसून होतो..

तेव्हा हा काठीवाला माझ्यापाशी आला
अन् त्याची विद्युत्पाती काठी
माझ्या कपाळावर टेकवून गेला.

--सदगुरू
---------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इशा.सदगुरु.ऑर्ग)
                        ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================