II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 05:55:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुरुपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     कितीही मोठे झालो तरी देखील आई- बाबा हे आयुष्यातील पहिले गुरु असतात. त्यांच्याकडूनच तर आपण आयुष्य जगण्याचे खरे धडे घेत असतो. चांगला माणूस म्हणून घडणे किती महत्वाचे असते हे त्यांच्याकडूनच तर कळते. Guru Purnima Quotes For Mom Dad जाणून घेत त्यांना शुभेच्छा द्यायला अजिबात विसरु नका.

     गुरुपौर्णिमा साजरी करताना आई-वडिल हे अगदी पहिल्या स्थानावर येतात. guru purnima quotes for mom dad-खास आपल्या लाडक्या आई बाबांसाठी.

             गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
आपला विचार न करता
माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

आई-वडिलांसारखे दैवत नाही,
अशा माझ्या दैवताला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

आई-बाबांनी दिलेला गुरुरुपी वसा,
आयुष्य आनंदाने भरणारा आहे
आई असते गुरुचे रुप,
बाबा असतात मायेची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुंचा महिमा अपरंपार,
त्याच्याशिवाय आयुष्याला कसला तो आधार
आई वडिलांसाठी गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु
तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु
कळत नव्हते तेव्हापासून तुम्हीच दोघे होता
माझ्या बाजूला
तुमच्यामुळेच मला मिळाली आज योग्य दिशा
गुरुपौर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान
माझ्या आई-वडिलांना
गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा

गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ
आई-बाबा आहात तुम्ही माझे
पण आहात खरे गुरु या आयुष्याचे
कोण म्हणतं आई-बाबा फक्त लाडवतात,
तेच तर खरे आयुष्याला दिशा देतात
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
=========================================

--लीनल गावडे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                      ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================